Breaking News

न्यूझीलंडमध्ये मशिदींत अंदाधुंद गोळीबार ; 49 जणांचा मृत्यू; 20 गंभीर जखमी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 49 जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. ख्राईस्टचर्च येथे हा गोळीबार करण्यात झाला. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होती तेव्हा हा गोळीबार करण्यात आला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरून पळ काढला होता. यासोबतच हल्लेखोराने लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील केले होते. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. ख्राईस्टचर्चच्या वेगवेगळ्या भागांत कारमध्ये स्फोटके सापडली असून, ही सर्व स्फोटके निकामी करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस प्रमुख माईक बुश यांनी दिली.

पोलिसांनी ख्राईस्टचर्च येथे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस पूर्ण प्रयत्न करीत आहेत. महत्त्वाचे म्हणजे मशीद अल नूर येथे मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव जमलेले होते. यामध्ये बांगलादेश क्रिकेट संघदेखील होता. मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू सुरक्षित आहेत.

एका साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार आपण प्रार्थना करत असताना गोळीबार झाल्याचा आवाज ऐकला. बाहेर येऊन पाहिले असता आपली पत्नी रस्त्यावर मृत्युमुखी पडली होती. दुसर्‍या एका व्यक्तीने आपल्या मुलांवर गोळीबार होताना पाहिल्याचे सांगितले. माझ्या आजूबाजूला सगळीकडे मृतदेह होते, असेही त्यांनी सांगितले. हल्लेखोराने लष्करी जवानांसारखे कपडे परिधान केले होते, मात्र अद्याप या माहितीला दुजोरा मिळाला नाही. दरम्यान, गोळीबारानंतर परिसरातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून लोकांना घराबाहेर न येण्याची सूचना करण्यात आली आहे, तसेच एखादी संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बांगलादेश क्रिकेट संघाच्या प्रवक्त्याने संपूर्ण संघ सुरक्षित असून मानसिक धक्क्यात असल्याची माहिती दिली आहे. सर्व खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्यास सांगण्यात आले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply