Breaking News

कळंबोली स्टील मार्केटमधील वाहनचालकांसाठी भोजन

कळंबोली : प्रतिनिधी

कोरूना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने लॉकडाऊन व संपूर्ण देशभरात संचार बंद जाहीर केली आहे. या काळात नवी मुंबईमधील स्टील मार्केटच्या वाहनतळात देशभरातील विविध प्रांतातील वाहनचालक अडकलेले आहेत. त्यांना पनवेल महानगरपालिका भोजनदान समितीच्या वतीने 100 वाहनचालकांना दोन वेळेच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. बंदीच्या काळात कोणत्याही प्रकारचे भोजनाकरीता कोणती व्यवस्था नव्हती, ही परिस्थिती लक्षात येताच सुरेश पाटील,  पंचशील शिरसाट, विनोद गायकवाड, योगेश पगडे सामाजिक कार्यकर्ते बबन भोईर यांनी तातडीने पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर व विनया म्हात्रे यांच्याशी संपर्क साधून धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानच्यामार्फत तातडीने दैनंदिन भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply