उरण : वार्ताहर
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये सर्वत्र लॉकडाऊन केल्याने उरण परिसरात रोजंदारीवर काम करणार्यांना काम मिळणे बंद झाले आहे, त्यांची उपासमार होत आहे. अशा गरिबांना मदत करण्यासाठी गोदारा रोडवेज प्रायव्हेट लिमिटेड व हरियाना वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने शनिवारी (दि. 28) अन्नदान करण्यात आले. सुमारे 150 गरिबांनी या अन्नाचा लाभ घेतला. ओएनजीसी सीआयएसएफ कॉलोनी समोरील झोपडपट्टी, नाईक नगर झोपडपट्टी येथील गरजूंना अन्नदान देण्यात आले. भात, डाळ, भाजी-चपाती अशाप्रकारचे अन्नदान करण्यात आले. या वेळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, गोदारा रोडवेज प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर बलबीर चौधरी, संजय डागर, विरेंद्र चौधरी, पोलीस उपनिरीक्षक अनिल चौहाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज पाटील, पोलीस नाईक भरत काळे, हवालदार योगेश राठोड, पोलीस शिपाई पी. एम. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.