पनवेल : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. ते नागरिकांच्या हिताचे असून, लॉकडाऊनचे पालन करून स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घ्या, असे आवाहन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. त्यांनी रविवारी (दि. 29) फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल मनपा हद्दीत औषध फवारणी सुरू झाली आहे. महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख व त्यांचे सहकारी नागरिकांची काळजी घेत आहेत. सभागृह नेते परेश ठाकूर व अन्य नगरसेवकांच्या सूचनेची दखल घेत मनपातर्फे गोरगरिबांना अन्न पुरविले जाणार आहे, तर भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सोसायटीत भाजी, किराणा उपलब्ध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या संकटावर आपण मात करू, असेही ते म्हणाले.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …