उरण : वार्ताहर – कोरोना संसर्ग होऊ नये त्या करिता सरकारने सर्वत्र लॉक डाऊन केले आहे, त्यामुळे रोजंदारीवर काम करणारे झोपड्यात राहणार्यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे. गरिबांना मदतीचा हात देण्यासाठी नवीमुंबई येथील भवानी फाऊंडेशनच्या वतीने सोमवार (दि. 30) उरण बोरी पखाडी येथील इंदिरा नगर झोपडपट्टीतील सुमारे 150 गरिबांना अन्नदान करण्यात आले.
या वेळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे, भवानी शिपिंग सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर के. डी. शेट्टी, चेअरमन नवीन शेट्टी, डायरेक्टर जिक्षिथ शेट्टी, समाजक्रांती आघाडी उरण तालुका अध्यक्ष एल. टी. लवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, हवालदार प्रमोद पाटील, पोलीस शिपाई प्रमोद आदी उपस्थित होते.