Breaking News

पनवेलमध्ये भाजप महिला मोर्चातर्फे नारीशक्ती उत्सव

महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा पनवेल शहर मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारीशक्ती उत्सवाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील गुजराती शाळेच्या मैदानावर करण्यात आले होते. महिला सक्षमीकरणाला चालना देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.
नारीशक्ती उत्सवात शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस संध्याकाळी विविध उपक्रम झाले. यामध्ये पाककला स्पर्धा, आरी वर्क वर्कशॉप, मेहंदी वर्कशॉप, पॉटरी वर्कशॉप अशा विविध स्पर्धा व कार्यशाळांचा समावेश होता. या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना व उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न भाजप महिला मोर्चाकडून करण्यात आला.
या कार्यक्रमाला महापौर नितीन पाटील, नगरसेवक अजय बहिरा, महिला मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेविका रूचिता लोंढे, माजी महापौर तथा विद्यमान नगरसेविका डॉ. कविता चौतमोल, नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, प्रीती जॉर्ज, प्रतिभा भोईर, अस्मिता घरत, शिवानी घरत, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत तसेच स्वाती कोळी यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. महिलांच्या कलागुणांना व उद्योजकतेला प्रोत्साहन देत समाजात त्यांचा सन्मान वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित नारीशक्ती या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी बोलताना महापौर नितीन पाटील यांनी, जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित नारीशक्ती उत्सव हा महिलांच्या सक्षमीकरणाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. स्त्री सक्षमीकरण केवळ बोलून नव्हे तर प्रत्यक्ष पाठबळ देऊनच शक्य आहे. महिलांना समाजात मान-सन्मानाने उभे राहण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असून पनवेल भाजपच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामुळे महिला बचत गट आणि महिला उद्योजिकांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीसाठी उत्तम व्यासपीठ मिळाले आहे, असे सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply