Breaking News

अमित खरे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवे सल्लागार

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून माहिती व नभोवाणी मंत्रालयाचे माजी सचिव अमित खरे यांची नियुक्ती झाली आहे. उच्च शिक्षण सचिव पदावरून ते 30 सप्टेंबरला निवृत्त झाले आहेत. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने खरे यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. यासंबंधीचा आदेश मंगळवारी (दि. 12) जारी करण्यात आला. त्यांची ही नियुक्ती कंत्राटी पद्धतीवर केली असून त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल किंवा पुढील आदेश येईपर्यंत ते या पदावर असतील, असे आदेशात म्हटले आहे. अमित खरे हे भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) 1985च्या तुकडीतील झारखंड कॅडरचे निवृत्त अधिकारी आहेत. सुमारे 36 वर्षांच्या सेवेत त्यांनी केंद्र सरकारसह झारखंड आणि बिहार सरकारच्या प्रशासनात जबाबदारीची पदे भूषविली आहेत. अत्यंत पारदर्शकपणे व ठामपणे निर्णय घेणे हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply