Breaking News

वाढत्या कंटेनर अपघाताने तळोजात भीतीचे वातावरण

पनवेल : वार्ताहर : तळोजा  एमआयडीसीच्या परिसरातील रस्त्यावर भले मोठे लोखंडी कंटेनर रस्त्यावरच पलटी होण्याच्या दोन घटना या आठवड्यामध्ये घडल्या आहेत. एक पनवेल फॅक्टरी मार्गी तळोजा एम आय डी सी तून कल्याण कधी जाणार्या रस्त्यावर आय.जी.पी.एल कंपनी परिसरातील असाही इंडिया ग्लास कंपनी समोर एक भला मोठा लोखंडी कंटेनर एम.एच. 46 – ऋ – 7431 पलटी झाला होता. दोन दिवसापूर्वी नावडे फाटा येथील रस्त्याच्या मधोमध एक लोखंडी कंटेनर चक – 46- ठ- 2645 पलटी झाला होता. या दोन्ही परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची व वाहनांची रहदारी असते सूदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जिवित हानी झालेले नाही.

परंतू कंटेनर पलटी होण्याच्या घटना अशा सतत घडत असल्याने या परीसरातील काम करत असलेल्या कामगारांना, मोटरसायकल वाहन चालकांच्या, नावडा फाटा येथील असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाला, तसेच पनवेल महानगर पालिकेचे कर्मचारी याच्या परिसरातील मुख्य रस्त्यांवर साफसफाईचे काम करतात. त्यामुळे यांचा जीवाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे. सुदैवाने याआधी कधीही कोणतीही जीवितहानी झाली नाही. ह्या दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलिसांची मात्र दमछाक झाली दोन्ही कंटेनर रस्त्याच्या बाजूला करताना जवळजवळ चार ते पाच तास लागले. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे तळोजा परिसरातील वाहतूक प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे माञ याकडे शासनाचे संपूर्णपणे दुर्लक्ष आहे. तलोजा परिसरातील रसत्यावर कोणत्याना कोणत्या प्रकारचे अपघात सुरूच आहेत.त्यामुळे तलोजा एम आय डी सी च्या परिसरातील व आजूबाजूच्या परिसरातील रस्ते अतिशय घातक ठरत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply