Friday , September 29 2023
Breaking News

गायिका होणारच, पण 50 मुलींचे आयुष्य घडविणार

पनवेलच्या मिथिला माळीचा निश्चय

पनवेल : नितीन देशमुख : बेटी बचाव, बेटी पढाओ अशा घोषणा सगळेच करताता पण  कलर्स मराठी  टीव्हीवर  ’ सुर नवा, ध्यास नवा ’ या लहान मुलांच्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून  पनवेलचे नाव मोठे करणार्‍या मिथिला माळीने मात्र आपल्याला मिळणार्‍या मानधनाच्या  रक्कमेतून गरीब मुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणाची जवाबदारी घेऊन एक आदर्श  समाजासमोर ठेवला असेच म्हणावे लागेल आपले गायिका बनण्याचे स्वप्न पूर्ण करताना पन्नास मुलींचे आयुष्य घडवण्याचे ध्येय तिने ठरवले आहे 

मिथिला माळी पनवेल मधील जुना ठाणा रोड वरील उगम नगर मधील चैत्रबन मध्ये राहणार्या अंजली आणि सचिन माळी यांची मुलगी. माळी कुटुंब मूळचे अलिबाग तालुक्यातील शहाबाजचे तिचे वडील लँड स्केपिंगचा व्यवसाय करतात. सचिन यांना  लहानपणा पासून गाण्याची आवड असल्याने ते गाण्याचा सराव करताना मिथिला बघायची. ते घरी नसले की ती स्वता तसे गाणे गाण्याचा प्रयत्न करायची.सचिन माळी यांच्या लक्षात आले की आपल्या मुलीच्यात गाण्याचा स्पार्क आहे. त्यांनी आपल्याला संधि मिळाली नाही आता आपली ईच्छा  तिच्यात बघायचे ठरवून मिथिलाला गाणे शिकवण्याचे ठरवले. रात्री जेवण झाल्यावर तिला फिरायला तलावाच्या काठावर घेऊन  गेले की गाणे म्हणायला सांगून तिला गाण्याच्या टिप्स देण्यास सुरुवात केली

मिथिला नऊ वर्षाची असताना तिने प्रथम मल्हार मोहत्सवात प्रेक्षकांसमोर गाणे गायले होते. त्यानंतर तिने स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली.आपल्या शाळेला तिने सतत चार वर्षे कोएसोच्या स्पर्धेत यश मिळवून दिले. नवी मुंबई महोत्सवात सुरेश वाडकर यांचे सोबत तिने गाणे गायले. त्यानंतर अनेक स्पर्धात तिला यश मिळाले. स्वर्गीय महमंद रफी साहेबांच्या मुलीने तिला घरी नेऊन आपले वडील  रियाज करायचे  त्या ठिकाणी बसवून तिला गाणे म्हणायला सांगणे यापेक्षा मोठे बक्षीस कोणते आहे. अबोल आणि आपल्या केसांचे दोन पोनी टेल  बांधलेली मुलगी हीच तिची पनवेलकरांना ओळखा आहे. ’  सुर नवा, ध्यास नवा ’ या लहान मुलांच्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी  महाराष्ट्रातील सहा हजार स्पर्धकांचा मेगा राउंड झाला यावेळी ’घुंगरू तुटल रे’ ही  मराठी लावणी आणि ’रैना बिती जाये’  हे गाणे मिथीलाने गायले आणि कोकण विभागातून तिची शेवटच्या 21 स्पर्धकात निवड झाली होती.   पण आता तिने आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. तिने आपल्याला  गायनाच्या कार्यक्रमातून मिळणार्या मानधनाची रक्कम ज्या मुलींची शिकण्याची ईच्छा आहे पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्या शिक्षण घेऊ शकत नाहीत त्या मुलींच्या शिक्षणासाठीखर्च करून एक आदर्श समाजापुढे निर्माण केला आहे. मिथिलाने सध्या चार मुलींच्या शिक्षणाची जवाबदारी स्वीकारली आहे. ’ सा रे गा मा पा ’  या शो मधील कलाकार किर्ति सिनोन, ढब्बू मलीक, अमल आणि आरमान मलीक यांनी तिला या कामात मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय तिघेजण आपले नाव न सांगण्याच्या अटीवर तिला मदत करणार आहेत. मिथीलाचे  गायिका  बनण्याचे स्वप्न आहेच पण त्याचवेळी पन्नास मुलींना शिक्षणासाठी मदत करण्याचे तिचे ध्येय आहे.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply