Breaking News

खारघर, पनवेलमध्ये स्त्रीशक्तीचा सन्मान

खारघर : प्रतिनिधी : खारघरमध्ये भाजप साऊथ इंडियन सेलच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण तसेच महिलांचा सन्मान या वेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.जागतिक महिला दिनानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. त्याअंतर्गत खारघरमध्ये भाजप साऊथ इंडियन सेलच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे नगरसेवक संतोष शेट्टी, नगरसेविका नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, आरती नवघरे, वर्षा प्रशांत ठाकूर, गीता चौधरी, बिना गोगरी, मोना अडवाणी, अनिता पाटील, स्वर्णलता व्यंकटरमन, योगिता कडू, अनिता जाधव यांच्यासह पदाधिकारी, महिला आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेलमधील आगरी समाज सभागृहात संगीता नितीन जोशी सामाजिक विकास मंडळ आणि यशकल्प फाऊंडेशन यांच्या वतीने ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. वीर वुमेन फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी विविध क्षेत्रातील महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पनवेलमधील आगरी समाज सभागृहात संगीता नितीन जोशी सामाजिक विकास मंडळ आणि यशकल्प फाऊंडेशन यांच्या वतीने ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रम संपन्न झाला, तसेच विविध क्षेत्रातील महिलांचा आणि महिला बचत गटाच्या महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखिका विद्या बाळ यांना साहित्य क्षेत्र, तर सामाजिक क्षेत्रात गुंजन गोळे, आरती नाईक, शैक्षणिक क्षेत्रात वर्षा सावंत, पत्रकारिता क्षेत्रात यामिनी कुलकर्णी, उद्योजिका क्षेत्रात मीनल मोहाडीकर, मेघा पाटील, कला, सांस्कृतिक क्षेत्रात गीता पुराणिक, आरोग्य क्षेत्रात शुभदा देशमुख, संजीवनी गुणे, नशाबंदी क्षेत्रात अर्पिता मुंबरकर, विज्ञान ज्योती पाडळकर, आदर्श संस्था क्षेत्रात क्रांतिकारी सेवा संस्था तसेच सहा महिला बचत गटांतील महिलांचा सन्मान करण्यात आला. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक प्रकाश बिनेदार, नगरसेविका चारुशीला घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ लेखिका विद्या बाळ आणि वीर वुमेन फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना परेश ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply