नगरसेवक संजय भोपी सोशल क्लबचे सामाजिक दायित्व
कळंबोली : प्रतिनिधी – संपुर्ण जगाला कोरोनाचा महाराक्षस गिळंकृत करायला निघाला असून या महाकाय राक्षसाला संपविण्यासाठी देश व राज्याने युद्ध सुरू केले आहे. यात संचारबंदी, लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये पोलीस, पालिका प्रशासन आपले शर्थीचे प्रयत्न करत जनतेची सेवा करत आहे. त्यांची सुरक्षेची काळजी वाहताना नगरसेवक संजय भोपी यांनी मोफत सॅनिटायझरचे वाटप केले.
सध्या संपूर्ण भारतात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना पोलीस प्रशासन महापालिका वर्ग व संपूर्ण शासन व्यवस्था जनतेच्या आरोग्य सुरक्षेसाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. हे करत असताना यातील अनेकांना आपली सुरक्षेची काळजी घेण्यास वेळ देखील मिळत नाही. शासन स्तरावर देखील अनेक सोयी सुविधांचा आता तुटवडा पडू लागला आहे. तेव्हा असा बिकट परिस्थितीत सामाजिक संस्थांनी मदत करण्यास पुढे आले पाहिजे हिच मनाची तयारी ठेवून खांदा कॉलनीतील सामाजिक व सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात अग्रेसर काम करणार्या नगरसेवक संजय भोपी सोशल क्लबने खांदेश्चवर पोलीस स्टेशन कर्मचार्यांना गुरुवारी मोफत हॅण्ड सॅनिटायझरचे वाटप केले. या वेळी पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ब’चे सभापती नगरसेवक संजय भोपी, विश्राम एकंबे, समुद्रा आणि पी. पी. प्रफुल्ल आदी उपस्थित होते.
खांदा कॉलनी : नगरसेविका कुसुम पाटील यांच्या प्रयत्नाने व उपस्थितीत सेक्टर 9 मधील परिसर निर्जंतुक करण्यात आला.
