Breaking News

युसुफ मेहरअली सेंटरच्या हीरक महोत्सवानिमित्त शनिवारी कार्यक्रम

पनवेल : प्रतिनिधी

युसुफ मेहरअली सेंटरच्या हीरक महोत्सवानिमित शनिवार (दि. 30) रोजी पनवेल तारा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  डॉक्टर जी. जी. पारीख यांनी पत्रकार परिषेदत दिली.

रायगड जिल्ह्यातील आदिवासी आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार्‍या युसूफ मेहरअली सेंटरच्या हीरक महोत्सव वर्षानिमित्त संस्थेची वाटचाल व उपक्रमांविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी बुधवारी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक  विकास मंडळ, मार्केट यार्ड, पनवेल येथे पत्रकार परिषदेचे  आयोजन करण्यात आले होते. या वेळी सेंटरचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉ. जी जी. पारीख, अध्यक्ष उषाबेन शहा, उपाध्यक्ष हरिष शहा, सहसचिव मधु मोहिते व संतोष ठाकूर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात युसूफ मेहरअली सेंटरने आपली मागील साठ वर्षात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. स्वातंत्र्य चळवळीत समाजवादी नेत्यांनी महात्मा गांधीजींची  भूमिका महत्त्वाची मानून ग्रामीण विकास व तिथे रोजगार संधी उपलब्ध करणे हे आपले विकास लक्ष असले  पाहिजे यावर भर दिला होता. युसूफ मेहरअली हे समाजवादी विचारांसाठी कार्यरत होते. त्यांना अल्प आयुष्य  लाभल्याने त्यांच्या  सहकार्यांनी 1962 मध्ये त्यांचा विचार व कार्य पुढे चालू राहण्यासाठी युसूफ मेहरअली सेंटरची स्थापना करण्यात आली. पनवेल तालुक्यात तारा येथे प्रथम आरोग्य सेवेला सुरुवात केली. रोजगाराभिमुख उपक्रम सुरू केले. आज 60 वषार्ंनी त्याचा  महावृक्ष झाला असून देशातील नऊ राज्यात आपली ओळख निर्माण केल्याचे डॉ. पारीख यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान शनिवार 30 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता तारा ता. पनवेल येथे हीरक महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन रायगडच्या पालक मंत्री आदिती तटकरे यांचे हस्ते होणार आहे. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, उरणचे आमदार महेश बालदी, माजी खासदार हुसेन दलवाई, तुषार गांधी, इरफान इंजिनियर व रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. पारीख यांनी या वेळी केले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply