Breaking News

पनवेल तालुक्यात 188 नवीन रुग्ण

  एकाचा मृत्यू; 154 जणांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 2) कोरोनाचे 188 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 154 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 139 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 89 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 49 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 65 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात 139 नवीन रुग्ण आढळले. पनवेल महापालिका क्षेत्रात कळंबोली, रोडपाली सेक्टर 17 प्लॉट नंबर 10 मधील एका व्यक्तींचा व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 29 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1230 झाली आहे. कामोठेमध्ये 25 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1424 झाली आहे. खारघरमध्ये 30 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 1348 झाली आहे.

नवीन पनवेलमध्ये 36 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1178 झाली आहे. पनवेलमध्ये 11 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1308 झाली आहे. तळोजामध्ये आठ नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 422 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 6910  रुग्ण झाले असून 5389 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.99 टक्के आहे. 1353 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 168 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन 49 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये उलवे 11, करंजाडे आठ, चिपळे पाच, आकूर्ली चार, देवद तीन, सुकापुर तीन, पोयंजे दोन, तसेच गुळसुंदे दोन, विहीघर, वडघर, उसर्ली खुर्द, निताळे, गव्हाण, चिंध्रण, भोकरपाडा, बारपाडा, पळस्पे, कुंडेवहाळ आणि काळोखे येथे प्रत्येकी एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. तर 65 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीण कोरोना पॉझिटिव्हची संख्या 2174 झाली असून 1756 जणांनी कोरोनावर मात केली असून  47  जणांचा मृत्यू झाला आहे.

उरणमध्ये आढळले 14 पॉझिटिव्ह

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

उरण तालुक्यात रविवारी  कोरोनाचे नवे 14 रुग्ण आढळले व सात रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

आढळलेल्या रुग्णांमध्ये नागाव उरण पाच, नाईक नगर जोपडपटटी नागाव, डोंगरी, रांजणपाडा, बोरी, नागाव, नागाव पिरवाडी, नवापाडा हनुमानमंदिरच्या मागे करंजा, मोरा उरण कोळीवाडा, जेएनपीटी येथे प्रत्येकी एक असे एकूण 14 रुग्णांचा

समावेश आहे.बरे झालेल्या रुग्णांमध्ये जासई दोन, जसखार दोन, उरण दोन, सोनारी येथे एक असे एकूण सात रुग्णांचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या  901 झाली आहे. त्यातील 698 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 173 कोरोना पॉझिटिव्ह  रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 30 कोरोना  पॉझिटिव्ह  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी महिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

रोहा तालुक्यात 11 जण बाधित

रोहे : रोहा तालुक्यात रविवारी 11 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात एकुण कोरोना रुग्णाची संख्या 602 वर पोहचली आहे. तर सहा रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 433 वर पोहचली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये साईनगर खांब दोन, सनसिटी वरसे दोन, पिंगळसई, साईकृपा अपार्टमेंट प्रभुआळी नागोठणे, चिंतामणी पार्क एक्सल कॉलनी, सिध्दार्थ नगर, सुयोग अपार्टमेंट सुदर्शन कॉलनी रोठखुर्द, पाईप नगर सुकेळी, वरचा मोहल्ला येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तालुक्यात 154 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.

नवी मुंबईत 380 जणांना संसर्ग

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईत रविवारी 380 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर 286 जण कोरोनामुक्त झाले. नवी मुंबईतील कोरोना बधितांची एकूण संख्या 16 हजार 107 तर बरे झालेल्यांची 10 हजार 855 झाली आहे. नवी मुंबईचा रिकव्हरी रेट 67 टक्क्यांवर स्थिरावला आहे. दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 431 झाली आहे. सद्य स्थितीत नवी मुंबईत चार हजार 818 रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी दिवसभरात एक हजार 029 रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून, एकूण रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या 19 हजार 483 झाली आहे. तर एकूण आरटीपीसीएस टेस्ट केलेल्यांची संख्या 34 हजार 897 झाली असून कोविड टेस्ट केलेल्यांची संख्या 54 हजार 380 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांची नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 55, नेरुळ 77, वाशी 41, तुर्भे 34, कोपरखैरणे 65, घणसोली 63, ऐरोली 36,  दिघा 9 इतके रुग्ण आढळले.

कर्जत तालुक्यात 25 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यात रविवारी 25 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यात नेहमीप्रमाणे कर्जत शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा आजही जास्त आहे.

शहरातील मुद्रे भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्यावाढ आजही कायम आहे. मुद्रे भागातील नेमिनाथ अपार्टमेंटमध्ये एकाच घरातील तब्बल पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कर्जत मुख्य शहरातील दोन व्यापार्‍यांना कोरोना ची लागण झाली असून त्यापैकी एक पदाधिकारी आहे. मात्र कर्जत तालुक्याचे तहसीलदार यांचे चालक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आता त्या चालकाच्या कुटुंबातील सर्व पाच जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. तालुक्यातील तीन तरुण पोलीस कर्मचारी यांना कोरोनाने बाधित केले आहे. शहरातील गुंडगे, नानामास्तर नगर, संजयनगर, दहिवली नीड भागात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

नेरळ गावातील कोरोना पॉझिटिव्ह व्यापार्‍यांची कोरोना पॉझिटिव्ह आई मागील काही दिवस मुंबई मध्ये उपचार घेत होती. त्याचे उपचारादरम्यान 1 ऑगस्ट रोजी मुंबईतील खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. तर नेरळ गावातील निर्माण नगरी आणि गंगानगर भागात दोन नवीन रुग्ण आढळून आले असून त्यातील 21 वर्षीय तरुणी ही तिच्या कोरोना पॉझिटिव्ह आजोबाच्या संपर्कात आल्याने पॉझिटिव्ह आली आहे.नेरळ बाजारपेठेत हॉटेल चालविणार्‍या व्यापार्‍यांचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात किरवली, नेवाळी, आषाणे, डिक्सळ, सांगवीमध्ये देखील रुग्ण आढळून आले आहेत. डिक्सळ येथील 54 वर्षीय पुरुष आणि 50 वर्षीय महिला असे दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील 539 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यात 117 रुग्ण हे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचवेळी 403 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply