Breaking News

कळंब बाजारपेठ दोन दिवस बंद

कर्जत ः बातमीदार  – कर्जतमधील कळंब या कर्जत-मुरबाड-शहापूर रस्त्यावरील गावात बाजारपेठ आहे. त्या बाजारपेठेत 23 मार्चपासून जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कळंब ग्रामपंचायत आणि कळंब व्यापारी फेडरेशनकडून 4 आणि 5 एप्रिल या कालावधीत बंद पाळण्यात येत असून सर्व दुकाने दोन दिवस बंद ठेवली जाणार आहेत.

 कर्जत-मुरबाड रस्त्यावरील कळंब गावाच्या आजूबाजूला 40हून अधिक गावे आणि आदिवासी वाड्या असून त्या भागात राहणार्‍या लोकांची कळंब ही बाजारपेठ आहे. बाजारपेठेत 50 दुकाने असून कमी अधिक प्रमाणात त्या ठिकाणी सर्व वस्तू मिळतात. कोरोनाची चर्चा सुरू झाल्यानंतर 23 मार्चपासून कळंब बाजारपेठ बंद आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य कोणत्याही प्रकारची दुकाने सुरू नाहीत, मात्र तरीदेखील खबरदारी घेण्यासाठी कळंब व्यापारी फेडरेशन आणि कळंब ग्रुप ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेऊन 4 आणि 5 एप्रिल हे दोन दिवस कळंब बाजारपेठेतील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दूध, भाजीपाला, किराणा व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांनीदेखील आपले सर्व व्यवहार दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कळंब बाजारपेठ दोन दिवस 100 टक्के बंद असणार आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply