प्रसन्नमूर्ती भला माणूस

संयम, जिद्द आणि संस्कार या त्रिसूत्रीची जोड माणसाकडे असल्यास आपोआपच समाजाशी ऋणानुबंध निर्माण होतात आणि समाजाच्या उत्कर्षासाठी ते नेहमीच आदर्शवादी ठरतात. याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणशेठ भगत. सामाजिक चळवळीतील आदर्श कार्यकर्ता म्हणून अरुणशेठ यांना ओळखले जाते. कुठलाही राग, मत्सर, द्वेषाला मनात थारा न देता कोणत्याही परिस्थितीत समाजोपयोगी कार्य करीत राहणे हा त्यांचा फंडा आहे.

अरुणशेठ यांनी समाजात मानवी मनाचे जाळे विणून माणुसकीचा गोफ तयार केला. चेहर्‍यावर कायम प्रसन्नता आणि तोंडात साखर, डोक्यावर बर्फ ठेवत अरुणशेठ काम करीत असतात. विशेष म्हणजे कधीही त्याचा बडेजाव त्यांनी केला नाही. तळागाळात पोहोचलेले, जमिनीवर राहून काम करणारे अशी त्यांच्या कार्याची हातोटी आहे. प्रत्येक कामात जीव ओतून मेहनत घेणारे अरुणशेठ भगत म्हणजे माणसे जोडणारे आदर्श व्यक्तिमत्त्वच आहे. त्यामुळे त्यांच्या अवतीभवती माणुसकीचा गोतावळा सातत्याने वावरताना दिसतो. अरुणशेठ यांनी कर्मवीर अण्णा, स्व. जनार्दन भगत साहेब, दि. बा. पाटील साहेब, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून घेतलेला वसा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळेच सर्वसामान्यांनाही ते हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या आयुष्यात केलेल्या काबाडकष्टांना आणि भोगलेल्या परिस्थितीला विसरले नाहीत. कष्टाला महत्त्व देत त्यांनी आपल्या आयुष्याची दिशा ठरवली. राजकारण, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील पदे भूषविताना त्यांनी या पदांना न्याय देण्याचे काम केले आहे. सध्या ते भाजपच्या पनवेल तालुक्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर दिलेली जबाबदारी ते नेहमीच यशस्वीपणे पार पाडतात. कायकर्ता असो वा सर्वसामान्य नागरिक त्यांना न्याय देण्याचे व मानसन्मानाने वागविण्याचे काम ते करतात. सकारात्मक दृष्टीचे सरळ आणि सोप्या भाषेतील पुस्तक म्हणजेच अरुणशेठ भगत होय. या पुस्तकातील अनेक पाने सुवर्णाक्षरी आहेत. त्यांचा जन्म जरी ग्रामीण भागातील असला, तरी त्यांनी आपल्या कर्तृत्वाने नेतृत्वाच्या दिशा रुंदावल्या आहेत आणि त्यामध्ये सर्वसामान्य माणसालाही सामावून घेतले आहे. अरुणशेठ यांनी सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, पंचायत समिती सदस्य, तालुकाध्यक्ष, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, रयत शिक्षण संस्था, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अशा विविध महत्त्वपूर्ण संस्था आणि संघटनांमध्ये हिरिरीने काम केले आहे. हाती आलेल्या जबाबदारीला त्यांनी नेहमीच न्याय दिला आहे. निवडणूक अथवा इतर कोणतीही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडण्यात अरुणशेठ यांचा कायम मोलाचा वाटा असतो. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समाजकार्याचा वसा त्यांनी अविरतपणे पुढे सुरूच ठेवला आहे. त्यांनी वयाची षष्ठ्यब्दी जरी पूर्ण केली असली, तरी काम मात्र तरुणांनाही लाजवेल अशा हिमतीने ते करतात. अरुणशेठ यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या पहिल्या भाषणात ते गडबडले, मात्र त्यांनी त्याचक्षणी ठाम निश्चय करून आपले वक्तृत्व उत्तम केले. हजारोंच्या जनसमुदायासमोर अरुणशेठ अर्थवाही असे दमदार भाषण करीत असतात. त्यांची वाहवा राज्यातील अनेक पक्षांतील नेतेमंडळींनीही केली आहे. अरुणशेठ कधीच बदलले नाहीत आणि बदलणारही नाहीत. म्हणूनच ते प्रसन्नमूर्ती भला माणूस म्हणूनच ओळखले जातात.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply