Breaking News

नियमांचे उल्लंघन करून सोसायटीची बैठक

कामोठ्यातील यमुना गृहनिर्माण संस्थेतील प्रकार; रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

कळंबोली : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याची कोरोनाच्या साथीने झोप उडविली आहे. देशात, राज्यात आणीबाणीची परिस्थिती असताना पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोमोठे येथील यमुना गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात मंगळवारी (दि. 7) सकाळी 11.30 वाजता खुली बैठक घेतली. संचारबंदी, लॉकडाऊन कलम 144 व सूचनांचे, आदेशांचे उल्लंघन करून बैठक बोलविल्यामुळे रहिवाशांना चिंतेत टाकण्याचा प्रकार केला. अशा पदाधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रहिवासी करीत आहेत.कोरोनाच्या महाभयंकर साथीला रोखण्यासाठी सरकार दिवसरात्र एक करीत आहे. या साथीत नागरिकांचे बळी जाऊ नयेत म्हणून अनेक उपाययोजना करीत असताना काही विघ्नसंतोषी लोक त्याला खो घालत आहेत. कोरोनाच्या साथीत सामाजिक अंतर कलम 144 लागू असताना हे सर्व नियम पायदळी तुडवून कोणतीही अधिकृत नोटीस न देता कामोठे प्लॉट क्रमांक 12, सेक्टर 14 मधील यमुना गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी खुलेआम बैठक बोलावली होती. या घरकुल संकुलात 84 कुटुंबे व 12 दुकाने आहेत. 84 कुटुंबे  निवास करीत असून पाचशेच्या घरात लोकवस्ती आहे. अशाप्रकारे बैठक घेऊन हे पदाधिकारी या रहिवाशांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

कायदेशीर कारवाईची मागणी

आणीबाणीच्या काळात शासनाचे नियम तोडून रहिवाशांच्या जीवाशी खेळणार्‍या या सोसायटीच्या पदाधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. या बैठकीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

आमच्या सोसायटीमध्ये बाहेरील व्यक्तींची येणे जाणे चालू असते. त्याबाबत विचार करण्यासाठी आम्ही चार-पाच जण सकाळी 11.30 वाजता जमलो होतो.

-विठ्ठल आचरे, सोसायटीचे सेक्रेटरी

Check Also

पनवेलमध्ये रविवारी खासदार श्रीरंग बारणे यांचा भव्य नागरी सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले लोकप्रिय …

Leave a Reply