Breaking News

सोशल डिस्टन्सिंग पाळून कामोठ्यात भाजीवाटप

पनवेल : वार्ताहर – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर, काही नियम आणि अटी शासनाकडून घालण्यात आले आहे. त्यापैकी एक सोशल डिस्टन्सिंग. या सोशल डिस्टन्सिंगमुळे या आजारावर नक्की अंकुश ठेवला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याच नियमाचे पालन करून शनिवारी (दि. 11) कामोठे वसाहतीमधील समाजसेवक सखाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून भाजी वाटप केली. तसेच घरात बसा व सुरक्षित रहा, असे आवाहन सखाराम पाटील यांनी केले आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर 500 किलो भाजी वाटप केली.

राज्यात थैमान माजवणार्‍या कोरोनाने पनवेलमध्ये देखील शिरकाव केला आहे. बघता बघता पनवेलमध्ये 21 रुग्ण सापडले आहे, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना देखील सुरू आहेत. तसेच राज्य शासनाकडून काही नियम आणि अटी घातल्या आहेत, त्यापैकी,  सोशल डिस्टन्सिंग ही एक महत्त्वाची अट आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गावर नक्कीच आळा बसेल असे सांगितले जात आहे. त्यानुसार या शासनाच्या निर्णयाचे पालन आता नागरिक काटेकोर पद्धतीने होतांना दिसून येत आहे. कामोठे वसाहतीमधील पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती सखाराम पाटील यांनी या आदेशाचे पालन करून दुसर्‍यांना देखील याचे काटेकोर पद्धतीने करण्याचे आवाहन केले आहे.

त्यानुसार शनिवारी याच नियमाचे पालन करून कामोठे वसाहतीमध्ये गरजूंना शनिवारी सोशल डिस्टन्सिंगचा अर्थ सांगून त्यांना भाज्यांचे वाटप केले आहे. जवळपास 500 किलो भाजी त्यांनी वाटप केली. या वेळी जवळपास एक मीटर अंतर ठेवण्यात आले होते. या वेेळी सर्व गरजू रहीवाशी देखील नियम पळताना दिसून आले. तोंडावर मास्क लावून खाली उतरलेले दिसून येत होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply