
पाली : प्रतिनिधी
भाजप कामगार मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीसपदी सुधागड पाली येथील ज्येष्ठ सक्रिय कार्यकर्ते राजेंद्र महादेव तथा भाऊ गांधी यांची, तर सुधागड तालुका अध्यक्षपदी रवींद्र खैरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना भाजप कामगार मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र सन्मानपूर्वक देण्यात आले.
राजेंद्र गांधी हे सुधागड तालुका भाजपचे माजी अध्यक्ष असून विधायक व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याबरोबरच जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ते कायम पुढे असतात. त्यांची कामगार मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर कामगार मोर्चाच्या सुधागड तालुका अध्यक्षपदी रवींद्र खैरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.