म्हसळा ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रतिबंध असतानाही म्हसळ्यातील दुचाकीस्वारांनी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे म्हसळा पोलिसांनी बुधवारी 42 दुचाकी व पाच तीनचाकी वाहनांवर कारवाई केली. म्हसळा शहरात पादचार्यांना नेहमीच दुचाकीस्वारांचा त्रास होत असल्याने या कारवाईचे पादचार्यांनी स्वागत केले. या कारवाईत दीपक ठूस, मृदुला शेलार, गणेश भोईर, ट्रॅफिक पोलीस दयानंद सरकटे, घोडके, श्यामराव कराडे, रावजी राठोड, गणेश मुंडे, संदीप फोंडे, धोंडू सांगळे आदी कर्मचार्यांचा सहभाग होता.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …