Tuesday , February 7 2023

कोरोनाविषयक निर्बंधातून रायगडला दिलासा मिळण्याची शक्यता कमीच

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्याचा कोरोना संक्रमण दर हळूहळू कमी होत आहे. मात्र अजूनही हा दर 10 टक्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे करोनाविषयक निर्बंधांतून रायगड जिल्ह्याला फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही.  रायगड जिल्ह्यात एक हजार 500 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील 728 जणांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. 557 जणांना प्राणवायू पुरवठ्यावर ठेवण्यात आले आहे. 215 जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तर 80 जणांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात 38 हजार 062 जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात तीन हजार 834 जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. म्हणजेच गेल्या आठवड्याचा करोना संक्रमण दर हा 11.32 टक्के येवढा होता. जिल्ह्यात यापुर्वीच्या आठवड्यातचा करोना संक्रमण दर 13 टक्के होता. जिल्ह्यात कोरोना संक्रमण वाढीचा दर हळूहळू कमी होत आहे, परंतु अजूनही हा दर 10 टक्केपेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या एकूण प्राणयुक्त खाटांपैकी 21.63 टक्के खाटा सध्या वापरात आहेत. शासनाच्या अनलॉक धोरणानुसार रायगड जिल्हा अजूनही वर्ग चार श्रेणीत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यातही रायगडकरांना निर्बंधांतून फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

रायगड जिल्ह्यातील उपचाराधीन रुग्णसंख्या

तालुका     : रुग्णसंख्या

अलिबाग    : 1 हजार 99

पनवेल मनपा हद्द : 1 हजार 23

पनवेल ग्रामीण    : 652,

उरण : 216,

खालापूर         : 340,

कर्जत     : 135,

पेण       : 615,

मुरुड             : 248,

माणगाव         : 227,

तळा            : 62,

रोहा              : 639,

सुधागड         : 100,

श्रीवर्धन         : 163,

म्हसळा         : 62,

महाड           : 260,

पोलादपूर        : 59

Check Also

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस …

Leave a Reply