पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात 21 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 519 नव्या रुग्णांची नोंद बुधवारी (दि. 30) झाली, तर दिवसभरात 584 रुग्ण बरे झाले आहेत.
मयत रुग्णांमध्ये पनवेल (मनपा आठ व ग्रामीण एक) तालुक्यातील नऊ, कर्जत चार, रोहा व महाड प्रत्येकी तीन आणि अलिबाग तालुक्यातील दोघांचा समावेश आहे; तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल (मनपा 256, ग्रामीण 72) तालुक्यात 328, अलिबाग 53, माणगाव 24, पेण 21, कर्जत 18, महाड 17, उरण 15, रोहा 14, खालापूर 10, सुधागड आठ, मुरूड चार, तळा तीन आणि श्रीवर्धन व पोलादपूर तालुक्यात प्रत्येकी दोन असे आहेत.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 46,802 आणि मृतांची संख्या 1266 झाली आहे. जिल्ह्यात 41,381 जण कोरोनामुक्त झाल्याने 4155 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
पनवेल महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचा दहावा वर्धापन दिन गुरुवारी (दि. १) उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने …
RamPrahar – The Panvel Daily Paper