Breaking News

नवी मुंबई पोलिसांमार्फत वाहनांसाठी नियमावली

पनवेल : वार्ताहर

सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर कामाशिवाय वाहने रस्त्यावर येवू नयेत यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून दुचाकी तसेच चारचाकी वाहनांसाठी नियमावली करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ई-पास शिवाय दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांना नवी मुंबई आयुक्तालय हद्दीत प्रवेश दिला जाणार नाही. दुचाकी वाहनांवर फक्त चालक असणार आहे डबल सिटला परवानगी नाही आहे. तीन चाकी, चार चाकी वाहनांमध्ये ड्रायव्हर व सोबत फक्त एक प्रवाशाला परवानगी आहे. माल वाहतुकीच्या वाहनात प्रवाशी नेण्यास बंदी आहे. शासकीय कर्मचारी, बँक कर्मचारी, वैद्यकीय सेवा कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरविणार्या या सर्वांनी ई-पास सोबत बाळगावा, ई-पास bovid19.mah[aolibe.in या वेबसाईटवर अर्ज करावा असे आवाहन नवी मुंबई पोलीस आयुक्तालय तर्फे करण्यात आले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply