कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील डीग्निटी लाइफस्टाइल वृद्धाश्रमात बुधवारी (दि. 8) आणखी 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे तेथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 14वर पोहोचली आहे. नव्याने आढळलेले रुग्ण हे कर्मचारी असल्याने तेथील ज्येेष्ठ नागरिकांसह परिसरात कोविड रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
कर्जत-नेरळ रस्त्यावर माणगाव तर्फे वरेडी गावाच्या हद्दीत डिग्निटी लाइफस्टाइल नामक ज्येष्ठ नागरिकांचे विश्रामगृह आहे. तेथे 150 जेष्ठ नागरिक राहतात, तर कामगार मिळून एकूण संख्या 200हुन अधिक आहे. 5 जुलै रोजी तेथील एका 71 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर व्यवस्थापनाने ज्येष्ठ नागरिक आणि कामगार अशा तब्बल 218 जणांच्या कोरोना टेस्ट करून घेतल्या होत्या. या सर्वांच्या टेस्टचे अहवाल येणे बाकी असतानाच 7 जुलै रोजी तेथे राहणारी आणखी एका 82 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. दरम्यान, टेस्ट केलेल्यांपैकी 12 जणांचे रिपोर्ट बुधवारी पॉझिटिव्ह आले. नवे रुग्ण तेथे काम करणारे कर्मचारी असून, ते दररोज आपल्या घरी आसपासच्या गावात जात असतात. त्यामुळे वृद्धाश्रमातील लोकांसह या कामगारांच्या संपर्कात आलेले त्यांचे कुटुंबीय अशा सर्वांच्या कोरोना टेस्ट आरोग्य विभागाला कराव्या लागणार आहेत.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …