Breaking News

भाजप नेते किरण माळी यांच्याकडून गोरगरिब कुटूंबांना जीवनावश्यक वस्तू

मोहोपाडा : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात जांभिवली ग्रामपंचायत, कराडे खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील गरजू गोरगरिबांवर  उपासमारीची वेळ येवू नये यासाठी भाजपाचे केळवणे जिल्हा परिषद विभागाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच किरण माळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच माजी सरपंच आंबो कोडींलकर यांच्या स्मरणार्थ मौजे जांभिवली, चांवढोली, कराडे खुर्द, कासप आदी गावातील शेकडो गरजू व गोरगरीबांना धान्यासह किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. या वेळी माजी सरपंच किरण माळी, आपटा विभागीय युवा मोर्चा अध्यक्ष कल्पेश कोंडीलकर, जांभिवली सरपंच रिया कोंडीलकर, कराडे खुर्द सरपंच भारती चितले, माजी उपसरपंच मिनल ठोंबरे, संतोष म्हात्रे, प्रशांत चितले, राजेश सोनावणे, धनाजी ठोंबरे, कैलास पवार, हेमंत चितले, कविता सताणे, रविं कोंडीलकर, सामाजिक कार्यकर्ते भगवान देशमुख, पवार, मनोहर कोंडीलकर, दिलीप टकले, संजय कोंडीलकर, रवींद्र कोंडीलकर, भरत कोंडीलकर, चंद्रकांत कोंडीलकर, नवनाथ कोंडीलकर आदी उपस्थित होते. तसेच किरण माळी यांनी सर्व नागरिकांना लॉकडाऊन काळात घरात राहण्याचे आवाहन केले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply