Breaking News

सफाई कर्मचार्यांबाबत सद्भावना

पेण ः प्रतिनिधी

कोरोनावर मात करण्यासाठी देशातील प्रत्येक नगरपालिका प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करीत आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करीत आहे. नर्स, सफाई कामगार आणि डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे. समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून हे सर्व जण काम करीत असल्याने तेच खरे देवदूत ठरले आहेत. रायगड जिल्ह्यात पनवेल, उरण, कर्जत, श्रीवर्धन आणि पोलादपूर हे तालुके सोडले तर इतरत्र कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही आणि हे शक्य झाले ते कार्यरत असलेल्या देवदूतांमुळेच. पेण नगरपरिषदेच्या सफाई कर्मचार्‍यांचाही कोरोनाविरोधातील लढाईत सिंहाचा वाटा आहे. त्यांच्याप्रति असलेल्या सद्भावनेतून शुक्रवारी पेण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 4मधील रहिवासी कमलाकर गुरव आणि परिवारातर्फे गुरव आळी येथे सफाई काम करणार्‍या दोन महिलांचा गुलाबाचे फूल, साडी आणि मानधन देऊन त्यांचे औक्षण करून सन्मान करण्यात आला. नागरिकांनीही अशाच प्रकारे आपापल्या परिसरातील सफाई कर्मचार्‍यांचा सन्मान करावा. त्यामुळे या कर्मचार्‍यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे कमलाकर गुरव यांनी सांगितले.

Check Also

राम तेरी गंगा मैली @४१ वर्षे; राज कपूरच्या दिग्दर्शनातील शेवटचा चित्रपट

चित्रपटाच्या नावात त्याचं व्यक्तिमत्त्व अथवा ओळख व्हायला हवी. त्यातही दिग्दर्शक दिसतो. राज कपूरच्या दिग्दर्शनातील चित्रपटाचे …

Leave a Reply