Breaking News

संचारबंदीत कोलाड पोलिसांचा चोख बंदोबस्त

रोहे : प्रतिनिधी

लॉकडाऊन तसेच संचारबंदीच्या काळात कोलाड पोलीस ठाण्याच्या वतीने  विभागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर 24 तास कोलाड पोलिसांची गस्त सुरू आहे. रोहा तालुक्यात तीन पोलीस ठाणे असून एक पोलीस ठाणे तालुक्याच्या ठिकाणी, तर दोन महत्त्वाचे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड व नागोठणे येथे आहे. कोलाड पोलीस ठाणे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या पोलीस ठाण्यातील पोलिसांना सतत सतर्क राहावे लागते. रोहा पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे चोख कामगिरी बजावत आहेत.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply