Breaking News

विनापरवाना वाहनचालकांवर कारवाई

रोहे : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊन काळात नागरिकांनी गर्दी करू नये, घराबाहेर पडू नये, विनापरवाना व विनाकारण वाहने घराबाहेर काढू नये, अशा सूचना वारंवार पोलिसांकडून दिल्या जात आहेत. तरीही विनापरवाना वाहने घेऊन फिरणार्‍या वाहनचालकांवर कोलाड सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत 289 केसेसमधून 67,100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

       कोलाड पोलीस ठाणे अंतर्गत दोन अधिकार्‍यांसह 29 पोलीस कर्मचारी तैनात आहेत. यातील महिला पोलीस दामिनी पथक व बिट मार्शलच्या माध्यमातून खांब ते सुतारवाडी परिसरात गस्त घालत आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे 14 किमीचे अंतर व 18 ग्रामपंचायतींच्या माध्यमातून 84 गावे मोडत आहेत. या भागात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तयाडे यांची टीम चोख बंदोबस्त राबवत आहे. कोलाड पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड नाक्यावर वाहन चौकशी केंद्र सुरू केले असून या ठिकाणी कोलाड पोलीस ठाण्याचे दिवसा व रात्री प्रत्येकी सहा कर्मचारी सतत वाहन तपासणी करीत आहेत. कोलाड नाक्यावर वाहन तपासणीदरम्यान 2 ते 23 एप्रिलपर्यंत मोटर वाहन कायद्याप्रमाणे 289 केसेस दाखल करून याद्वारे 67,100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply