Breaking News

प्रशिक्षकपदासाठी विराटची शास्त्रींनाच पसंती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि इतर सपोर्ट स्टाफ यांच्यासाठी सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अर्ज मागवले आहेत. सध्या असलेले प्रशिक्षक रवी शास्त्री हे या पदावर कायम राहणार की नवे प्रशिक्षक टीम इंडियाला लाभणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. यादरम्यान कर्णधार विराट कोहलीने शास्त्रींनाच आपली पसंती दर्शविली आहे.

प्रशिक्षक निवडीसंदर्भात विराट म्हणाला, क्रिकेट सल्लागार समितीच्या पदाधिकार्‍यांनी अद्याप मला यासंदर्भात काहीही विचारलेले नाही. जर त्यांना माझे मत हवे असेल तर मी त्यांना नक्कीच मदत करेन. मी स्वतः जाऊन त्यांच्याशी संवाद साधेन. रवी शास्त्री यांच्याबाबत जर बोलायचे झाले, तर आमच्या संघाचा आणि त्यांचा चांगला मेळ जुळला आहे. त्यामुळे त्यांनाच या पदावर कायम ठेवण्यात आले तर मला आनंदच आहे.

Check Also

उलवेत 13 मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे …

Leave a Reply