Breaking News

रुग्णालयीन कर्मचार्यांना कोरोनाविषयक प्रशिक्षण

कर्जत ः बातमीदार – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील आरोग्य अधिकारी-कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी आरोग्य कर्मचार्‍यांनी आपल्या समस्या आणि मागण्या पुढे करून त्यांच्याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्रप्रमुख सुचिता गवळी आणि डॉ. अमोल भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपजिल्हा रुग्णालयात येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे, कशेळे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विक्रम खंदाडे यांनी येथील सर्व डॉक्टर व कर्मचार्‍यांना कोविड-19 या विषयावर सखोल प्रशिक्षण देऊन प्रात्यक्षिके करून

दाखविण्यात आली.

कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूने देशभरात थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत कर्जत उपजिल्हा रुग्णालयात डॉ. अमोल भुसारी यांनी माहिती दिली. संशयित रुग्ण कसा ओळखावा याबरोबरच क्लास वन वर्ग, क्लास टू वर्ग, क्लास थ्री वर्ग, क्लास फोर वर्ग यांनी कशा प्रकारे पीपीइ किट घातले पाहिजेत, तसेच पीपीइ किट घालण्याचे व काढण्याचे रूम वेगवेगळे पाहिजेत, कारण हॉस्पिटलमधील डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे, तसेच नित्यनेमाने मास्क तोंडाला लावला पाहिजे, बाहेरून आल्यावर स्वच्छ हातपाय धुतले पाहिजेत, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे आदी कोरोनासंदर्भातील माहिती देण्यात आली. या वेळी कर्जत उपजिल्हा आणि कशेळे ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबागकडून 100 पीपीइ किट्स उपलब्ध झाले आहेत, तसेच कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पीपीइ किट्स घालण्याचे व बदलण्याचे वेगवेगळे रूम आहेत. कोणाला सर्दी, खोकला, दमा, ताप असल्यास कर्जत उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा. हॉस्पिटलच्या प्रांगणात हात धुण्यासाठी हॅण्डवॉशची व्यवस्था करण्यात आली आहे.

-डॉ. मनोज बनसोडे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय कर्जत

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply