नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात लॉकडाऊनमध्ये मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकाने सुरू करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. मास्क बंधनकारक, 50 टक्के कर्मचारी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या अटींसह केंद्रीय गृहमंत्रालयाने ही परवानगी दिली आहे.
गाव पातळीवर मॉल्सव्यतिरिक्त सर्व दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी आहे, मात्र कंटेन्मेंट झोन किंवा कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित ठिकाणी कोणतीही दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी नसेल. तसेच शहरांमध्येही महापालिका आणि नगरपालिका हद्दीतील एकेकटी दुकाने, मॉल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भाग नसलेली कोपर्यावरची दुकाने, रहिवासी सोसायट्यांतील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर बाजारपेठांमधील दुकाने मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही, तसेच शॉपिंग मार्केट, मार्केट कॉम्पलेक्स आणि शॉपिंग मॉल्स सुरू ठेवण्यासाठी मनाई असेल.
मद्यविक्री दुकानांना परवानगी नाही. सलून, ब्युटी पार्लर्सही बंद राहणार आहेत, तर ई-कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तू पोहचवण्याची परवानगी आहे.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …