Breaking News

एक्स्प्रेस वेवर अपघातात प्रवासी ठार, चालक जखमी

खोपोली : प्रतिनिधी
भरधाव वेगातील पिकअप टेम्पो उभ्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडकल्याने झालेल्या अपघातात टेम्पोतील प्रवासी ठार, तर चालक जखमी झाला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रसायनी हद्दीत हा अपघात घडला.
लॉकडाऊन काळात निर्मनुष्य झालेले रस्ते आणि कमी वाहने यामुळे महिनाभर अपघाताचे प्रमाण शून्यावर आले होते, पण शुक्रवारी (दि. 24) रात्री 12.30च्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भाताण बोगद्याजवळ साइडपट्टीनजीक बंद पडलेल्या कंटेनरचा पिकअप चालक विकास घारगे (खटाव, जि. सातारा) याला अंदाज न आल्याने या वाहनाची जोरदार धडक कंटेनरला बसली. त्यात पिकअपचा समोरील भाग पूर्णपणे चेपला जाऊन चालकाच्या बाजूला बसलेले नानासाहेब घारगे
(रा. वडगाव, जि. सातारा) जागीच ठार झाले, तर चालक विकास जखमी झाला आहे. या अपघातप्रकरणी विकासविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून रसायनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एन. के. डोके अधिक तपास करीत आहेत.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply