मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. लॉकडाऊन काळात शेतमाल खरेदीला केंद्र सरकारने सूट दिली आहे. त्यानंतर राज्य सरकारनेसुद्धा खरेदीची घोषणा केली असली तरी तुरळक ठिकाणीच खरेदी केंद्र सुरू असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. कापूस, तूर, चणा खरेदी केंद्र मोठ्या प्रमाणात सुरू करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. खरेदीची प्रक्रिया अशीच राहिल्यास शेतकर्यांना संकटाचा सामना करावा लागेल. त्यामुळे लगेचच खरेदीची यंत्रणा सक्षम करून त्यांना दिलासा द्यावा. शेतमाल खरेदी झाली तरच शेतकर्यांच्या हाती पैसा येईल आणि त्यांना पुढच्या हंगामाच्या कामाला लागता येईल. सर्वच ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावीत, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …