Breaking News

गोविंदराव पाटील यांचा 100वा वाढदिवस उत्साहात

अलिबाग : प्रतिनिधी

कुलाबा जिल्ह्याचे माजी संघचालक गोविंदराव पाटील यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर संघाचे रायगड विभाग संघचालक यशवंतराव पाटील, संघाचे प्रांत बौद्धिक प्रमुख उदय शेवडे उपस्थित होते. या वेळी जयंतराव (मामा) टिळक, माजी प्रांत व्यवस्थाप्रमुख माधवराव भावे, माजी विभाग संघचालक दत्तोपंत साळुंके, जनकल्याण समितीचे कोकण कार्यवाह अविनाश धाट, संघाचे विभाग सहकार्यवाह सुनील पाटील, गिरीश तुळपुळे, रविकिरण काळे, राकेश पाठक, संतोष सुतार, बंडू काळे, श्रीनिवास काणे आदी मान्यवर उपस्थित होते. गोविंदराव यांची 1942 साली शेताच्या बांधावर प्रतिज्ञा घेणारे स्वयंसेवक म्हणून ख्याती होती. लोकल बोर्डाचे सदस्य म्हणूनही त्यांनी परिसरात अनेक विकासकामे केली. 1948 आणि 1975 साली सत्याग्रह केल्यानंतर दोन वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. आपल्या शंभर वर्षांच्या वाटचालीत आलेले अनुभव गोविंदराव यांनी उपस्थितांना सांगितले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply