रोहे : प्रतिनिधी – रोह्यात संक्रात झाली की वनवे लागण्यास सुरुवात होते. याचे गुड कायम आहेच. परंतु हे वणवे रोखण्याची गरज आहेच. हा कालावधी संपल्यानंतर आता तालुक्यातील काही भागात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडयात वणवे लागण्यास सुरवात झाली आहे. हे वणवे रोखण्यासाठी वनखात्याने उपाययोजना करण्याची गरज आहे.
सुर्यनारायण तापू लागल्यानंतर उष्णतेचा पारा वाढु लागते. या वेळी जंगल भागात काही प्रमाणात गारवा असते. या गारव्यामुळे जंगल भागात लगत असलेल्या वस्तींना गारवा जाणवतो. परंतु हा गारवा नष्ट होण्यास सुरवात वणव्यामुळे होते. रोह्यात जानेवारी संपले की जंगलात वणवे लागत असतात. या वेळी हे प्रमाण कमी असले तरी रोह्यातील जंगलात वणवे लागण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी जंगलातील वनस्पतींचे नुकसान झाले आहेच, परंतु जंगल लगत असलेल्या अनेक शेतकर्यांच्या शेतात लावलेली झाडे ही जळुन खाक झाली आहे. जानेवारी व मार्चपर्यंत काही प्रमाणात जंगलात वनवे लागले आहेत.
रोहा तालुक्यात गेल्या दोन महिन्याचा कालावधी पहात भिसे खिंड, सुकेली खिंडी व खांब विभागातील जंगल भागात काही ठिकाणी वनवे लागति होते. त्यानंतर आता तालुक्याच्या उर्वरित काही भागात पुन्हा वणवे लागण्यास सुरुवात झाली आहे. रोहा शहर ते लांडर, बोरघरपर्यंत या गावा लगत असलेल्या जंगल भागात वणवे लागत आहे. शनिवारी सायंकाळी भुवनेश्वर लगात असलेल्या जंगलात व निवी गावा लगत असलेल्या जंगल भागात वणवे लागल्याचे दिसुन आले आहे. हे वणवे वेळीस रोखले पाहिजे अन्यथा जंगल भागातील वनस्पती नष्ट तर होतेच परंतु त्यालगत असलेल्या शेतकर्यांचे ही नुकसान होते. या वनव्यात अमाप जंगल संपत्ती नष्ट होते. अनेक झाडे जळुन जातात. या वेळी लहानसहान वन्यजीव ही होरपळुन जातात.