3000 कुटूंबांना अन्नधान्याचे वाटप
पाली : प्रतिनिधी – सुधागडवासीय आदिवासी बांधवांना आमदार रविशेठ पाटील यांनी मदतीचा हात दिला असून 3000 आदिवासी कुटूंबाना धान्याचे वाटप करण्याचा सेवाभावी उपक्रम राबविला आहे. कोरोनाच्या जैविक महामारीत हातावर पोट असलेले मजूर, श्रमजीवी, कष्टकरी, आदिवासी बांधवांना मोठ्या कठीण परिस्तितीचा सामना करावा लागतोय. अशा परिस्तितीत कुणावरही उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता पेण सुधागड रोहा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांनी सुधागडवासीय आदिवासी बांधवांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले.
या वेळी बोलताना रविशेठ पाटील म्हणाले की, कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे. या आपत्तीला देशातून हद्दपार करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे. लॉक डाऊन च्या काळात शासनाने दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन करूया, सर्वानी स्वछता राखा, कोरोना विषाणूंचा मानवी संसर्ग जीवघेणा ठरतोय, कोरोनाचे युद्ध घराबाहेर न पडता जिंकणे शक्य आहे. त्यामुळे सर्वानी घरात बसा काळजी घ्या, कोरोनाला हरविण्यात आपण निश्चित पणे यशस्वी होऊ, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
या वेळी आमदार रविशेठ पाटील यांच्यासह युवा नेते वैंकुंठशेठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देशमुख, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, भाजप मंडळ अध्यक्ष दादा घोसाळकर, ललित पाटील, आतोणे सरपंच रोहन दगडे आदी उपस्तीत होते.
कोरोनाच्या जैविक महामारीने संपूर्ण जग कवेत घेतले आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने प्रतिबंधात्मक खबरदारी म्हणून लॉकडाऊन घोषित केले. कोरोनाच्या संकटात सर्वांना मुबलक अन्नधान्य मिळेल यासाठी प्रयत्नशील असून या काळात कुणीही उपाशी राहणार नाही.
– आमदार रविशेठ पाटील