Breaking News

आगरी-कराडी कामोठे महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

कामोठे : रामप्रहर वृत्त
कामोठे येथे कै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि झेंडा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आगरी-कराडी कामोठे महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 14) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवाचे यंदाचे 14वे वर्ष असून नागरिकांसाठी ही पर्वणी आहे.
या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, झेंडा संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. जय पावणेकर हा थांबणारा कार्यकर्ता नाही. त्याच्या मनात येते ते काम तो निश्चयाने पूर्ण करतो. कामोठ्याचे प्रश्न मांडण्यात तो नेहमी अग्रभागी असतो. सर्वांच्या सुखदुःखात धावणारा असा कार्यकर्ता सोबत असल्याचा मला अभिमान आहे. अशा धडपड करणार्‍या कार्यकर्त्यांना साथ देण्यासाठीच मी आवडीने कामोठे महोत्सवाच्या उद्घाटनाला आवर्जून येतो.
भाजप कामोठे शहर मंडळाचे अध्यक्ष विकास घरत यांनी सांगितले की, झेंडा संस्थेच्या वतीने वर्षभर अनेक उपक्रम राबवले जातात. कामोठे महोत्सव तरुण, महिला आणि लहान मुलांना आपली कला सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देतो. आगरी-कराडी ही आपली संस्कृती टिकवण्याचे काम हा महोत्सव करत आहे.
संस्थेचे अध्यक्ष जय पावणेकर यांनी व्यासपीठावरून बोलताना म्हटले की, गेल्या वर्षांत या महोत्सवाला आणि झेंडा संस्थेला ज्या ज्या मान्यवरांची गरज पडली त्या सर्वांनी आपल्या अधिकारांच्या मर्यादेत राहून नेहमीच सहकार्य केले आहे.
या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास माजी नगरसेवक अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, कुसुम म्हात्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष के.के. म्हात्रे, स्वामी म्हात्रे, प्रदीप भगत, राजेश गायकर, भाऊ भगत, श्रावण घरत, हर्षवर्धन पाटील, विद्या तामखडे, हरजिंदर कौर सिंग, सुनील गोवारी, सुशील शर्मा आदी उपस्थित होते.
कामोठ्यातील हा महोत्सव स्थानिक संस्कृती, कला, परंपरा आणि समाजभावना दृढ करण्यासाठी गेली अनेक वर्षे योगदान देत असून नागरिकांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे यंदाही महोत्सवाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply