Breaking News

टंचाई आराखड्यात रायगड जिल्ह्यातील पाच तालुक्यांसाठी 44 विंधण विहिरींना मंजुरी

म्हसळा : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील रोहा, माणगाव, तळा, म्हसळा, व श्रीवर्धन या पाच तालुक्यांना 44 विंधण विहीर खोदाईला रायगड जिल्हाधिकारी यानी मंजुरी दिली आहे.

रोहा तालुका तीन गाव पाच वाड्यांसाठी आठ विंधण विहीरी, माणगाव तालुका तीन गावे सात वाड्यांसाठी 10 विंधण विहीरी,तळा तालुका दोन गावे 10 वाड्यांसाठी 12 विंधण विहीरी, म्हसळा तालुका चार गावे चार वाड्यांसाठी आठ विंधण विहीरी, श्रीवर्धन तालुका एक गावे पाच वाड्यांसाठी साठ विंधण विहीरी, अशा एकूण 13 गावे 31 वाडयांमध्ये 44 विंधण विहीरी जिल्हाधिकारी रायगड यानी मंजुर केल्या आहेत.

तालुका निहाय गावे व वाडया पुढीलप्रमाणे, रोहा तालुका देव न्हावे गावदेवी मंदिर, देवन्हावे व देवन्हावे अशी तीन गावे, सुडकोली खडकवाडी, सारसोली बौद्धवाडी, कोकबन आदिवासी वाडी, तांबडी बकम्माची वाडी, भिसे राजेवाडी पाच वाड्यांसाठी आठ विंधण विहीरी, माणगाव तालुका बामणोली, कडापूर, नगरोली तीन गावे, वडगाव , कुरकडे, वडघर, बोरघर (बौध्दवाडी) थरमरी, गांगवली काते (आदिवासी वाडी) या सात वाड्यांसाठी 10 विंधण विहीरी, तळा तालुका ताम्हणे, भानंग ही दोन गावे मेंढे, बोरघर, वांजळोशी (आदिवासी वाडी), रोवळा, केळशी, काकडशेत, कळसांबडे, बोरघर, दहिवली (बौध्दवाडी), 10 वाड्यांसाठी 12 विंधण विहीरी, म्हसळा तालुका वारळ ग्रामपंचायत, तुरूंबाडी, खारगाव बुद्रुक, खारगाव खुर्द चार गावे, कृष्णनगर, चिचोंडे, तोराडी, (आदिवासी वाडी), तोराडी कुणबी वाडी चार वाड्यांसाठी आठ विंधण विहीरी, श्रीवर्धन तालुका कारविण एक गाव, वडवली (एसटी स्टँडजवळ, भाडखोल हायस्कुल, वावे (सावंतवाडी) वावे, आदिवासी वाडी, गालसुरे जाखमाता नगर या पाच वाड्यांसाठी सहा विंधण विहीरी मंजुर केल्या आहेत. अशा एकूण 13 गावे 31 वाडयांमध्ये 44 विंधण विहीरी जिल्हाधिकारी रायगड यानी मंजुर केल्या आहेत.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply