Breaking News

पेणमध्ये जमावबंदी, वाहनबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर गुन्हे दाखल

पेण : प्रतिनिधी

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता जिल्हाधिकार्‍यांनी जमावबंदी व वाहनबंदीचे आदेश दिले आहेत, मात्र तरीसुद्धा पेण व वडखळ परिसरात अनेक दुकानदारांनी दुकानात नागरिकांची गर्दी जमवून तसेच वाहनचालकांनी वाहन चालवून शासकीय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संबंधित दुकानदारांवर व वाहनचालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेण चावडी नाका येथील मोहनलाल अ‍ॅण्ड ब्रदर्स किराणा मालाचे दुकान, फणस डोंगरी येथील अंकीत स्पेअर पार्ट दुकान, पेण-खोपोली रोडवरील ठाणे भारत सहकारी बँकेसमोरील अक्षय जनरल स्टोअर्स या ठिकाणी लोकांची गर्दी जमवून मालाची विक्री केली जात होती. या सर्व दुकानदारांवर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारे वडखळ नाका येथे एक जण स्वतःची बसंत पान स्टॉल नावाची पान टपरी उघडी ठेवून ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास न सांगता तंबाखू विक्री करीत होता.  त्याच्यावर वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर सावरसई येथील एक जण खोपोली बायपास येथे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच 06 बीवाय 4343) खोपोली बाजूकडून पेण बाजूकडे स्वत: चालवत घेऊन जात होता. त्याला खासगी वाहन न वापरण्याचे आदेश असतानासुद्धा समजावून सांगूनदेखील त्या आदेशाकडे दुर्लक्ष करून तो पुन्हा वाहन घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply