
पनवेल : वार्ताहर
सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर सर्वत्र स्वच्छता मोहिम सुरू आहे. औषध फवारणी सुरू आहे व विशेष काळजी घेतली जात आहे. असे असतानाही नवीन पनेवल सेक्टर 6 परिसरात दोन दिवसापूर्वी कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याची माहिती माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांना मिळताच त्यांनी तातडीने त्या परिसरात पनवेल महानगरपालिकेचे पथक औषध फवारणीसाठी पाठवून तो परिसर फवारणी करून घेतला. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वत्र जोरदारपणे औषध फवारणी सुरू आहे. असे असतानाही रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते. दोन दिवसापूर्वी अशाचप्रकारे नवीन पनवेल सेक्टर 6 परिसरात एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती तेथील रहिवाशांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांना दिली. तत्परतेने या घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी त्वरित पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे संपर्क साधून संबंधित अधिकार्यांना व कर्मचार्यांना त्या ठिकाणी पाठवून त्यांच्याकडून त्या परिसरात औषध फवारणी करून घेतली.