Breaking News

पनवेलमध्ये तेरापंथ जैन समाजातर्फे प्रवचन कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलच्या तेरापंथ जैन समाजाच्या वतीने तेरापंथ धर्मशनच्या साधवी प्रमुख कनक प्रभा यांचा पदारोहण अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शहरातील जैन समाज हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात साधवी निर्वाणश्री यांच्यासह समाजाच्या प्रमुख वरिष्ठांनी या वेळी प्रवचन केले. या वेळी तेरापंथचे प्रमुख विनोद बाफना, अध्यक्ष जितेंद्र संचेती, मंत्री संजय बाफना, मुंबई महिला मंडल मंत्री अलका मेहता, पनवेल संयोजिका टिना संचेती, निवर्तमान संयोजिका ज्योति बाफना, सहसंयोजिका कल्पना बाफना, रचना बाफना, मुंबईचे अनुव्रत उपाध्यक्ष रोशन मेहता, स्थानकवासी समाजाचे अध्यक्ष राजेश बांठिया, कोशाध्यक्ष अंकित  चौधरी, शिव देवड़ा, राकेश काठेड, सुनील शुकलेचा, प्रमोद डांगी आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाचा धडाका सुरू आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Leave a Reply