Breaking News

रोहा तालुक्यात गावठी दारू जप्त; तिघा जणांना अटक

रोहे ः प्रतिनिधी : तालुक्यात रोहा आणि कोलाड पोलिसांनी ठिकठिकाणी धाडी टाकून गावठी दारू आणि ती तयार करण्याचे रसायन मिळून एकूण 10900 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. रोहा तालुक्यातील कोलाड विभागात चिंचवली तर्फे आतोणे या ठिकाणी शुक्रवारी सकाळी कोलाड पोलिसांनी छापा टाकला. त्या वेळी आरोपी (रा.चिंचवली तर्फे आतोणे, ता. रोहा) याने प्लॅस्टिक कॅनमध्ये 20 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू बाळगल्याचे आढळले. पोलिसांनी आरोपी (रा.चिंचवली तर्फे आतोणे, ता. रोहा) याला अटक करुन मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास  पोलीस नाईक राकेश आर. राऊळ करीत आहेत.

 त्याच दिवशी त्याच गावात 10.30 वाजता कोलाड पोलिसांनी धाड टाकली असता महीला आरोपी रा.चिंचवली तर्फे आतोणे रोहा यांच्या कडुन 1050 रूपये किमतीचा एक सफेद मळकट रंगाचा प्लास्टीकचा कॉन त्यास धरणेस अंगाचीच कडी व त्यास बुच त्यामध्ये 20 लिटर गावठी हातभटटीची तयार दारू कॅनसह असा प्रेव्हीशन माल आपले ताब्ये कब्जात बाळगलेले स्थितीत मिळुन आला.यातील आरोपीस कोलाड पोलिसांनी अटक केली आहे.

या संबधीत कोलाड पोलिस ठाण्यात दारूबंदी अधिनियम 1949चे कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राकेश राऊळ करीत आहेत.

रोहा तालुक्यात रोहा पोलिसांनी ही शुक्रवारी सकाळी तालुक्यातील हेदाई येथे धाड टाकली असता आरोपी रा.म्हसाडी याच्या कडून 8700 रूपये किमतीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ मिश्रीत रसायन (एकूण 750 लिटर रसायन) आपले ताबेकब्जात बाळगले स्थितीत मिळुन आला. यातील आरोपीस रोहा पोलिसांनी अटक केली आहे.

या संबधी रोहा पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात दारूबंदीअधिनियम 1049 चे कलम 65 ड, इ, एफ प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलिस निरीक्षक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र भोनकर हे करीत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply