Tuesday , March 28 2023
Breaking News

आजपासून रंगणार अध्यक्षीय कॅरम स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेला सोमवार (दि.18)पासून सुरुवात होत आहे. सेंट्रल रेल्वेच्या माटुंगा येथील वेल्फेअर हॉलमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेतील पुरुष एकेरी, महिला एकेरी व 18 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत मुंबईतील एकंदर 176 खेळाडूंनी भाग घेतला आहे.पुरुष एकेरी गटात प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थित मुंबई महापालिकेच्या गिरीश तांबेला प्रथम मानांकन देण्यात आले असून, महिला एकेरीत इंडियन ऑईलचा काजल कुमारीला प्रथम मानांकन मिळाले आहे; तर 18 वर्षांखालील मुलांमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नीरज कांबळेला अग्र मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply