Breaking News

‘अक्षरकार’ कमल शेडगे यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी

सुप्रसिद्ध ‘अक्षरकार’ कमल शेडगे यांचे शनिवारी

(दि. 4) मुंबईतील राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि सून असा परिवार आहे.

कमल शेडगे यांना मुळात चित्रकलेची आवड होती. वृत्तपत्रात नोकरी सुरू केल्यानंतर ते अक्षरलेखनाकडे वळले.1962 साली ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकासाठी त्यांनी पहिल्यांदा ’लेटरिंग’ केले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. फिल्मफेअर आणि माधुरी या मासिकांसाठीही त्यांनी

आपले योगदान दिले होते.

Check Also

कलावंतांच्या रखडलेल्या मानधनाचा प्रश्न विधिमंडळात

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाकडून सुधारणा व तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील …

Leave a Reply