Breaking News

खांदा कॉलनी परिसरात गोरगरिबांना धान्यवाटप

कळंबोली : प्रतिनिधी

सध्या कोरोनो प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या 40 दिवसानंतर विविध परिसरात गोरगरिब व मध्यमवर्गीय लोकांना आता विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे ही संकटकालीन वेळ लक्षात घेऊन विविध सामाजिक संघटनानी आता गोरगरिबांना मदतीचा हात पुढे केला आहे.

खांदा कॉलनीत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळातर्फे गरजू, गरीब निराधार लोकांची यादी आपल्या विविध सेक्टरमधील सदस्यांकडून मागवली जात आहे व रोज 50 लोकांपर्यंत सोशल डिस्टनचे महत्त्व लक्षात घेऊन घरपोच धान्य वाटप केले जात आहे. विशेषत: अनेक मध्यमवर्गीय कुटूंब आपली अडचण कोणाजवळ बोलू शकत नाही. अशा गरजू लोकांचा आपल्या मंडळाच्या सदस्यातर्फे शोध घेवून त्यांना घरपोच धन्य पुरवठा केला जातो. यात तांदूळ गहू, डाळ, तेल कांदे इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा सामावेश आहे लॉकडाऊन संपेपर्यंत आम्ही अडचणीत सापडलेल्या अनेक गरजूंपर्यंत मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करू असे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष श्याम लगाडे सचिव महेंद्र कांबळे खजिनदार संदिप भालेराव व सदस्य भास्कर गायकवाड आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply