खारघर : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण काळुराम पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी भगवान पाटील (प्रभाग समिती अ), आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे (प्रभाग समिती अ), आरोग्य निरीक्षक खारघर विभाग जितेंद्र मढवी यांच्या सोबत शनिवारी (दि. 2) सोडिअम हायफोक्लोराईड फवारणीसंदर्भात एक आढावा बैठक घेतली.
दिवसेंदिवस खारघरमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून नागरिकांच्या सोडिअम हायफोक्लोराईड फवारणी संबंधात तक्रारी येत होत्या. ज्या इमारतीमध्ये कोरोना रुग्ण सापडत आहेत, त्या इमारतीमध्ये तातडीने सोडिअम हायफोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे आणि या इमारतीच्या आजूबाजूला सुद्धा फवारणी करण्यात यावी, अशी विनंती अधिकारीवर्गाला करण्यात आली.