Breaking News

उरण येथे तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज

तालुका आरोग्य अधिकार्‍यांची माहिती; कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणा अहोरात्र कार्यरत

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यात कोरोना संसर्गजन्य विषाणूचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा 24 तास अहोरात्र कार्यरत आहेत. उरण तालुक्याची लोकसंख्या लक्षात घेता आणखी तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची आवश्यकता आहे. मागील कित्येक वर्षांपासून येथील आवश्यकतेनुसार रायगड जिल्हा परिषदेकडून उरण तालुक्यासाठी आणखी तीन आरोग्य केंद्रांची गरज असल्याबाबतची माहिती उरणचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांनी दिली असून, सध्या एकमेव कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे.

उरण तालुक्यात एकमेव कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. तर चाणजे, घारापुरी, जसखार, नवघर, चिरनेर, विंधणे, वेश्वी व जासई अशी एकूण आठ उपआरोग्य केंद्र आहेत. यामध्ये कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शासन मंजूर डॉ. बी. एस. चिरमुले व डॉ. अनुप्रिया सावंत या दोन वैद्यकीय अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच आरोग्य केंद्रात एक औषध निर्माते दोन पुरुष व दोन महिला सुपरवायझर असे पाच आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज बद्रे यांच्या आधिपत्याखाली तीन वैद्यकीय अधिकारी व एक आयुष्य मेडिकल अधिकारी, आठ परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी यांच्यासह एक रुग्णवाहिका व 108 क्रमांकाची रुग्णवाहिका अशा दोन रुग्णवाहिका कार्यान्वित आहेत. कोरोनाचे फक्त संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना तात्काळ 14 दिवसांच्या वलगिकरण कक्षात चाचणीसाठी ठेवण्यात येत आहेत. तर उपआरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्‍यांची नेमणूकीची तरतूद नाही. मात्र प्रत्येक आरोग्य उपकेंद्रात एक परिचारिका व एक आरोग्य कर्मचारी अशा दोन कर्मचार्‍यांची नेमणूक मंजूर आहे.आठ उपआरोग्य केंद्रापैकी तीन ठिकाणची परिचरिकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे इतर उपआरोग्य केंद्रातील परिचारिकांकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आला आहे.

तालुक्यातील फक्त प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एक रुग्णवाहिका मंजूर असून ती कार्यरत आहे. त्याचप्रमाणे उपकेंद्रांना रुग्णवाहिकांची व्यवस्था देण्यात नाही. तर रुग्णवाहिकांच्या एका चालकाची नेमणूक मंजूर असून, कोप्रोली आरोग्य केंद्रात कित्येक वर्षे कंत्राटी चालकाची नेमणूक करण्यात आली आहे.उरण तालुक्याची लोकसंख्या पुरुष-महिला अशी एक लाख 50 हजार एवढी आहे.

उरण तालुक्यातील दीड लाख लोकसंख्येच्या तुलनेत तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रत्येक प्रार्थमिक आरोग्य केंद्रास दोन वैद्यकीय अधिकारी, एक औषध निर्माते दोन पुरुष-महिला सुपरवायझर आरोग्य कर्मचारी, तर एक रुग्णवाहिका चालक अशी आवश्यकता आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply