Breaking News

सायकल प्रवासातून पर्यावरणविषयक जनजागृती

मोहोपाडा ः प्रतिनिधी : रिस येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिंदे यांचे चिरंजीव शुभम शिंदे व पुणे येथून अक्षय गायकवाड याने 13 दिवसांत रसायनी ते कन्याकुमारी हा 1700 किलोमीटरचा खडतर सायकल प्रवास पूर्ण केला. या वेळी दोघांनी चार राज्ये, 15हून अधिक मोठी शहरे, शंभरहून अधिक गावे, त्यामध्ये भाषेची अडचण असा खडतर सायकल प्रवास करून पर्यावरणात होणारे बदल, प्रदूषण तसेच नागरिकांना सायकलची आवड निर्माण व्हावी व निसर्गाचे रक्षण करावे, हा संदेश घेऊन जनजागृती केली.

रसायनीतील रिस येथे आपल्या मायभूमीत रविवारी (दि. 16) पोहचताच त्याच्या कार्याचा गौरव म्हणून माजी सरपंच संदीप मुंढे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन शुभम शिंदे व अक्षय गायकवाड यांना गौरवून त्यांचे कौतुक करण्यात आले. शुभम व अक्षय यांनी याअगोदरही पर्यावरण संदेश घेऊन रिस ते गोवा कोकणकिनारी मार्गाने सायकल प्रवास केला आहे.

दोघांनी 13 दिवस सायकल चालवून 1700 किलोमीटरचा प्रवास करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत जनजागृती केल्याने त्यांना रिस येथे शुभेच्छा देण्यासाठी माजी सरपंच कृष्णा पारंगे, उपसरपंच दत्तात्रेय जांभले, समाजसेवक प्रकाश गायकवाड, संजय कांबळे, संतोष पाटील, दिलीप पारंगे, नामदेव कोकंबे, कैलास म्हात्रे, नाना म्हात्रे, देवीदास म्हात्रे, पत्रकार, परिसरातील नागरिक व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply