मुंबई : प्रतिनिधी
दूरदर्शन वाहिनीने लॉकडाऊनच्या काळात 90च्या दशकातील सर्व मालिका पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतला. यामधील ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. रामानंद सागर यांच्या उत्तर रामायण या मालिकेचा शनिवारी
(दि. 2) शेवटचा भाग होता. हा भाग सुरू होताच ट्विटरवर र्ीीींंरीीरारूरपषळपरश्रश ट्रेंड सुरू होता.
उत्तर रामायणाचा शेवटचा एपिसोड पाहून चाहते भावूक झाले. त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. एका युजरने ‘हा सीन सर्वांना भावूक करणारा आहे. राजासोबत प्रजेलाही समजदार व्हावे लागणार,’ असे म्हटले, तर दुसर्या एक युजरने हा सीन अतिशय भावनिक आहे, असे म्हटले आहे.
एकेकाळी ही मालिका खूप गाजली होती. तिचे प्रसारण होत असताना रस्ते ओस पडत.
-‘महाभारत’चीही क्रेझ
रामायणाबरोबरच महाभारत मालिकेचीही लोकप्रियता वाढताना दिसत आहे. त्यामुळेच आता बी. आर. चोप्रा यांची महाभारत मालिका कलर्स या वाहिनीवर दाखविण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. येत्या 4 मेपासून ही मालिका संध्याकाळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसरीकडे श्री कृष्ण ही मालिका सुरू झाली आहे.