Tuesday , February 7 2023

वक्तृत्व स्पर्धेत पूनम सिरसाट प्रथम

उरण ः वार्ताहर

गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या वतीने नावडे येथे आयोजित केलेल्या रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत येथील छत्रपती विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी पूनम सिरसाट (इ. 10वी अ) हिने माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. आम्ही कर्मवीरांचे वारसदार, या विषयावर पूनम शिरसाट हिने केलेल्या भाषणाने श्रोत्यांसह परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि उपस्थित अनेक शाळांमधून आलेल्या स्पर्धकांमधून तिला प्रथम विजेती म्हणून घोषित करण्यात आले. नावडे येथील प. जो. म्हात्रे विद्यालयामध्ये झालेल्या या विभागीय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण संस्थेच्या रायगड विभागाचे विभागीय अधिकारी संजय मोहिते यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. पूनम सिरसाटच्या यशाबद्दल व तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक चंद्रकांत पाटील, विजय म्हात्रे यांचेही रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तसेच श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअरच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत, सदस्य अनंताशेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, प्राचार्या साधना डोईफोडे, उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णूके, संस्थेचे आजीव सदस्य प्रमोद कोळी, अटल टिंकरिंग लॅबचे प्रमुख रवींद्र भोईर आदी मान्यवरांनी अभिनंदन केले. विद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या हस्ते पूनमचा विशेष सत्कार करण्यात आला. डोईफोडे यांनी अभिनंदनपर भाषणात विद्यार्थ्यांनी पूनमचा आदर्श घेऊन तल्लख मेंदूने अभ्यासासोबतच इतर क्षेत्रातही आपल्या क्षमता सिद्ध करण्याचे आवाहन केले. समारंभाचे सूत्रसंचालन सागर रंधवे व सांस्कृतिक विभागप्रमुख ज्योत्स्ना ठाकूर यांनी केले. प्राचार्या साधना डोईफोडे यांनी पूनम सिरसाट हिच्या यशाबद्दल तिला रोख रकमेचे बक्षीस दिले.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply