Breaking News

एअर फोर्सकडून रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव; कोविड योद्ध्यांना अनोखी मानवंदना

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनावर मात करण्यासाठी अहोरात्र झगडणार्‍या कोविड योद्ध्यांना भारतीय सेनेकडून रविवारी (दि. 3) अनोख्या पद्धतीने सलामी देण्यात आली. हवाई दलाच्या लढावू विमानांतून देशातील वेगवेगळ्या भागांत कोविड रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करून त्यांचे कौतुक करण्यात आले. कोरोना व्हायरसविरोधात पोलीस, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, मीडिया आघाडीवर लढत देत आहे. डॉक्टर, नर्सेस तर आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करीत आहेत. नागरिकांची सेवा करणार्‍या या कोविड योद्ध्यांचा आत्मविश्वास भारतीय हवाई दलाकडून उंचाविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply